27 September 2020

News Flash

चाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर

चाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर

अभिनेत्री कोएना मित्रा संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री कोएना मित्रासह चौघांची तक्रार

मुंबई : गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर कृत्रिमरीत्या चाहत्यांचा (फॉलोअर्स) आकडा फुगवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यापैकी चित्रपट-मालिकांशी संबंधित चार ख्यातनाम व्यक्तींनी आपल्या बनावट समाजमाध्यम खात्यांबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तक्रार करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कोएना मित्रा हिचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते अस्तित्वात असल्याची माहिती मित्र, चाहत्यांकडून मिळाली, असे कोएनाने तक्रारीत म्हटले आहे. कोएनाचे छायाचित्र, नाव वापरून तयार केलेल्या या खात्यावर ३६ हजार चाहते आहेत. चाहत्यांना कोएनाबाबत चौकशी करायची असेल तर साहिल खान एहसास या व्यक्तीशी संपर्क साधा, असा त्यावर उल्लेख आहे. इन्स्टाग्रामसोबत कोएनाच्या नावे युटय़ूब चॅनेलही होते, असा दावा या तक्रारीत आहे. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपावण्यात आले आहे. या विभागाने फेसबूक, गुगलशी पत्रव्यवहार करून कोएनाच्या नावे अस्तित्वात असलेले बनावट इन्स्टाग्राम खाते, युटय़ूब चॅनल बंद करून घेतले.

‘फॉलोअर्सवरकार्ट’ या संकेतस्थळाकरवी चाहते वाढविणाऱ्या १७६ पैकी १२ ख्यातनाम व्यक्तींची पथकाने चौकशी केली. तसेच दोन संकेतस्थळांच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:05 am

Web Title: actress koena mitra complaint about fake social media accounts zws 70
Next Stories
1 पालिकेच्या १०८ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू
2 बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात
3 ‘म्हाडा’च्या कारभारात ‘नगरविकास’ची लुडबुड!
Just Now!
X