मुंबई : समाजमाध्यमांवरील वक्तव्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अभिनेत्रीकडे अंगरक्षक म्हणून काम केलेल्या तरुणास डी. एन. नगर पोलीस पथकाने कर्नाटक येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात लग्न करण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याचा आरोप एका तरुणीने के ला होता.

त्याआधारे डी. एन. नगर पोलिसांनी अंगरक्षकाविरोधात बलात्कार, शारिरिक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. आठ वषापासून तक्रोरदार तरुणी आरोपीस ओळखत होती. गेल्यावर्षी जून महिन्यात आरोपीने लग्नाची मागणी घातली. तरुणीने त्यास होकार दिला. काही महिन्यांनी आईच्या मृत्यूचे कारण पुढे करत आरोपीने तरुणीकडून ५० हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर आरोपी बेपत्ता झाला. तो कर्नाटक येथील आपल्या गावी असून अन्य तरुणीबरोबर लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तक्रोरदार तरुणीला मिळाली. त्यानंतर तिने तक्रोर दिल्याचे डी. एन. नगर पोलिसांनी सांगितले.