वैद्यकीय व आरोग्य सेवेतील गट – अ मधील अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदविका आणि पदवी असल्यास अनुक्रमे अतिरिक्त तीन आणि सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
गट-अ मधील रुपये १५,६००-३९,१०० ग्रेड पे ६,६०० आणि त्याहून अधिक वेतनश्रेणी असणाऱ्या विशेषज्ञ संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक आणि संचालक आरोग्य सेवा या पदांवरील वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता अधिकाऱ्यांना अनुक्रमे तीन व सहा अतिरिक्त वेतन वाढ देण्यात येईल. या वेतनश्रेणीत ज्या अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबर २०११ आणि ११ नोव्हेंबर २०१२ चा लाभ घेतला असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे एकूण ९ कोटी ७८ लाख रुपये खर्च येईल.