28 November 2020

News Flash

आदित्य दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ‘जैस थे’च

बीडमधील 'आदित्य दंत महाविद्यालया'विरोधातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर महिना होत आला तरी हा प्रश्न अद्याप 'जैसे थे'च असल्याने विद्यार्थी हवालदील झाले

| February 10, 2013 02:36 am

बीडमधील ‘आदित्य दंत महाविद्यालया’विरोधातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर महिना होत आला तरी हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’च असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत.
या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी १५ जानेवारीला खासदार संजय निरूपम आणि ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’चे अध्यक्ष जयंत जैन यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. मात्र, महिना होत आला तरी विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे भिजत घोंगडे तसेच आहे. या महाविद्यालयात शिकणारे बहुतांश विद्यार्थी मुंबई-पुण्याचे आहेत.
तक्रारींमधील गांभीर्य लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाविरोधातील तक्रार पोलिसांनी दाखल करून घ्यावी, असे आदेशही दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची तक्रार बीडच्या पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. पण, महाविद्यालयाची चौकशी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 2:36 am

Web Title: aditya dental collage student problems as it is
Next Stories
1 पशुधन विकास अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत
2 अवयव प्रत्यारोपणाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्र : सरकारकडून १० दिवसांत स्पष्टीकरण
3 पाच मिनिटांत रुग्णवाहिकेचा महापालिकेचा प्रस्ताव
Just Now!
X