27 February 2021

News Flash

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा

लॅण्ड क्रूझर गाडीच्या दुरुस्तीची रक्कम देण्यास नकार देऊन आदित्यने धमकावले.

आदित्य पांचोली

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात एका मोटर मेकॅनिकने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लॅण्ड क्रूझर गाडीच्या दुरुस्तीची रक्कम देण्यास नकार देऊन आदित्यने धमकावले, अशी तक्रार त्याने केली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

जोगेश्‍वरी पश्‍चिमेला राहणारे तक्रारदार मोहसीन राजपकर हे अनेक वर्षांपासून आदित्य पांचोली याला ओळखतात. त्यांनी यापूर्वीही आदित्यच्या गाडीची दुरुस्ती केली होती. २०१७ मध्ये आदित्यने त्याची कार दुरुस्त करण्यासाठी फोन करून घरी बोलावलं होतं. त्यांची लॅण्ड क्रूझर ही गाडी पूर्णपणे बंद पडली होती आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च २ लाख ८२ हजार इतका आला. हा खर्च मागण्यासाठी आदित्य यांना वारंवार संपर्क साधला. त्यांनी पैसे न देता उलट शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असे मोहसीनने लेखी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आदित्य पांचोलीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 2:53 pm

Web Title: aditya pancholi booked for threatening car mechanic over the issue of bill payment
Next Stories
1 मोबाईल फोन वाचवण्यासाठी चोराच्या मागे धावला अन् ICU मध्ये पोहचला
2 लोकसभा निवडणूक लढविण्याचा तूर्त विचार नाही
3 महापौर महाडेश्वर अखेर राणीच्या बागेत मुक्कामी
Just Now!
X