21 October 2020

News Flash

सरकार स्थिर असल्यानेच आदित्य ठाकरे लक्ष्य – परब

आमच्याशिवाय कोणी सरकार चालवू शकत नाही असा त्यांचा समज होता

संग्रहित छायाचित्र

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात विरोधकांचा उद्देश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा आहे. आमच्याशिवाय कोणी सरकार चालवू शकत नाही असा त्यांचा समज होता. पण महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याने असल्याने विरोधक  अस्वस्थ आहेत.  सरकारवर टीका करण्यासारखे दुसरे काही नसल्याने आरोप करत आहेत, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर केली आहे.

एखाद्या खटल्याचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी राज्याची परवानगी लागते किं वा न्यायालयाच्या आदेश लागतो. बिहारने तशी परवानगी दिली होती. गुन्हा महाराष्ट्रात घडल्याने महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी व संघराज्य व्यवस्थेचे पालन करावे असे राज्य सरकारचे म्हणणे होते. सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारचा विरोध नव्हता असे परब यांनी सांगितले.

‘सीबीआय’ला सहकार्य करणार – देशमुख

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. सीबीआयला राज्य सरकार सहकार्य करेल.  पोलिसांच्या तपासात कोणताही दोष आढळला नाही व योग्य पद्धतीने तपास झाला, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ही मुंबई पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विरोधी नेते राजकारण करत आहेत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:12 am

Web Title: aditya thackerays target is because the state government is stable abn 97
Next Stories
1 स्थानिकांना नोकऱ्यांसाठी राज्यात लवकरच कायदा
2 औषधांच्या अतिवापरामुळे अन्य संसर्गाचाही धोका; करोना उपचारांबाबत इशारा
3 कला अभ्यासक्रमांबाबत विद्यार्थी संभ्रमात
Just Now!
X