News Flash

अदनान सामी पुन्हा अडचणीत

पाकिस्तानी गायक अदनान सामी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून, आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयाने त्याला नोटीस बजावली.

| November 22, 2013 02:28 am

पाकिस्तानी गायक अदनान सामी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून, आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयाने त्याला नोटीस बजावली.  सामीपासून विभक्त झालेली पत्नी सबा गलादरी हिने सामीविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका केली असून न्या. एम. एल. टहलियानी यांच्यासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सामीला नोटीस बजावत ओशिवरा पोलिसांनीही याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सामीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला काही अटी घातल्या होत्या. मात्र या अटींचे सामीने पालन केलेले नाही, असा दावा करीत सबा हिने त्याच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामी आपली छळवणूक करीत असल्याची तक्रार सबा हिने एप्रिल २००९ मध्ये ओशिवरा पोलिसांत केली होती. २६ मे २००९ रोजी उच्च न्यायालयाने त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र पोलिसांकडे पारपत्र जमा करण्याचे तसेच परदेशी जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घेण्याची अट घातली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:28 am

Web Title: adnan sami again in trouble
Next Stories
1 पारा घसरला पण थंडी दूरच
2 साखरेचे दर वाढेपर्यंत उसाला भाव नाही- मुख्यमंत्री
3 जिया खानची आत्महत्या नव्हे हत्या?
Just Now!
X