मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत भेसळ क रुन मोठय़ा प्रमाणात विक्री होते. त्याचप्रमाणे अन्नधान्यातील भेसळीची प्रकरणे याआधी उघडकीस आली आहेत. भेसळ पदार्थामुळे लहान मुलांपासून मोठय़ांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ‘इंडियन कौन्सिल फॉर मेडिकस रिसर्च’ (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात दूध भेसळीमुळे क्षयरोग होत असल्याचे दिसून आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 12:42 am