26 November 2020

News Flash

‘टीआरपी’ वाढताच जाहिरातींचा ओघ

वाहिनी सुरू होण्याआधीही कोटय़वधींच्या उलाढाली

(संग्रहित छायाचित्र)

टीआरपी घोटाळ्यात सहभागी वाहिन्यांच्या आर्थिक उलाढाली विशेषत: जाहिरातींचा ओघ अचानकपणे वाढल्याच्या नोंदी आढळल्याचा दावा गुरुवारी गुन्हे शाखेने केला. या वाहिन्यांच्या गेल्या पाच वर्षांतील आर्थिक उलाढालींचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार संशयितांपैकी एका वाहिनीने तीन महिन्यांच्या कालावधीत ८० कोटींचा महसूल जाहिरातींच्या माध्यमातून गोळा केला. याच कालावधीत वाहिनीकडे जाहिरातींचा ओघ जास्त होता, अशी नोंद आढळली आहे. उर्वरित वाहिन्यांबाबतही अशा नोंदी आढळल्या आहेत.

आतापर्यंत के लेल्या तपासात एक वाहिनी प्रत्यक्ष सुरू होण्याच्या चार ते पाच महिन्यांआधीच कोटय़वधींच्या जाहिराती स्वीकारल्याची माहिती पुढे आली असून त्याबाबतही तपास सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच ‘न्यूज नेशन’ आणि ‘महामूव्हीज’ या दोन वाहिन्यांचाही टीआरपी घोटाळ्यात सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागल्याचा दावाही या अधिकाऱ्याने के ला.

दरम्यान, गुरुवारी ‘रिपब्लिक’ वाहिनीचे मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुंदरम् यांच्याकडे गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.

बनावट कागदपत्रे..

* गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टीआरपी घोटाळ्याच्या तपासातून आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मूळ गुन्ह्य़ात संबंधित कलमे वाढवली जातील, असे सांगण्यात आले.

* तत्पूर्वी, बुधवारी या गुन्ह्य़ात पुरावा नष्ट करणे, तांत्रिक तपशील नष्ट करणे, चौकशीस सहकार्य न करणे, समन्स किं वा नोटीस बजावल्यावरही चौकशी टाळणे आदी कलमे वाढवण्यात आली होती.

* कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवण्यासाठी ग्राहकांना पैशांचे आमिष दाखवणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. मात्र सूत्रधाराच्या शोधासाठी गुन्हे शाखेची धडपड सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:18 am

Web Title: advertising flows as trp increases abn 97
Next Stories
1 रत्नागिरी, सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीच्या सूचना 
2 पदोन्नती, रिक्तपदे भरण्याबाबत मंत्रालयात मासिक आढावा
3 मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण लवकरच निश्चित करणार
Just Now!
X