मुंबई उपनगरीय लोकलमधून आता मुंबई महानगरातील वकिलांना प्रवासाची परवानगी मिळाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येत आहे. याबरोबरच वकिलांच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा मिळाली आहे. सकाळी ८ पर्यंत, नंतर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत आणि सायंकाळी ७ नंतर प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. महिन्याचा पास मिळणार नाही, फक्त तिकीटावर प्रवास करावा लागेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 1:12 am
Web Title: advocates allowed local train travel abn 97