माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन दीड वर्षांनी ३० ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ट्रेन धावणार असून या मार्गादरम्यान रविवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या मार्गावर ट्रेनच्या बारा फेऱ्या होतील. सुरक्षिततेची पूर्तता केल्यानंतर नेरळ ते माथेरान ही सेवा सुरू केली जाईल.

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन ही एक पर्वणीच होती. मोठय़ा संख्येने येणारे पर्यटक या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद लुटतात. तसेच स्थानिकांच्या वाहतुकीचेही हे एक साधन बनले. मात्र जानेवारी २०१६ ते मे २०१६ या काळात माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा घटना घडल्या. दोन घटना तर रुळावरून घसरल्याच्या होत्या. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा मे २०१६ पासून बंदच ठेवण्यात आली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने केलेल्या सुरक्षा उपाययोजनांपैकी नेरळ ते माथेरानपर्यंत संरक्षक भिंतीचे तसेच रुळांचे काम हाती घेण्यात आले. यातील अमन लॉज ते माथेरानपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या दरम्यानची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गादरम्यान बारा फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी चालवण्यासाठी मध्य रेल्वेला दर वर्षी २० कोटी रुपयांचाही तोटा सहन करावे लागतो.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू