News Flash

आता पाण्यातही ‘उबर’, मुंबई ते आलिबाग करा जलद प्रवास

मुंबईकरंना आता एका क्लीकवर 'स्पीड बोट' (Speed Boat) या वाहतुकीच्या नव्या पर्यायाचा आनंद घेता येणार आहे

संग्रहित छायाचित्र

कार आणि ऑटो रिक्षानंतर उबर आता ‘स्पीड बोट’मध्येही आपलं नशीब अजमावणार आहे. मुंबईकरंना आता एका क्लीकवर ‘स्पीड बोट’ (Speed Boat) या वाहतुकीच्या नव्या पर्यायाचा आनंद घेता येणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा अशी उबरची स्पीडबोट चालणार आहे. याबबात अद्याप उबर कडून कोणतीच थेट घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच मुंबईकरांना एक नवा वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचं उबरकडून सांगण्यात आलं आहे.

सहा जणांसाठी बुकिंगची सोय उबर अ‍ॅपच्या माध्यमातून उबर बोटसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. गरजेनुसार तुम्हांला संपूर्ण स्पीडबोटदेखील बुक करता येणार आहे. सुरूवातीला गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा प्रवास करण्याची सोय देण्यात येईल. पुढे भविष्यात ही सोय अलिबागपर्यंत आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई अशीदेखील केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 6:56 pm

Web Title: after cars autos uber to now offer boat rides from gateway of india
Next Stories
1 राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत सध्या कुठलीही चर्चा नाही : नवाब मलिक
2 सध्याचा लोकायुक्त कायदा जनतेची दिशाभूल करणारा; नवाब मलिक यांचा आरोप
3 टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची आत्महत्या
Just Now!
X