निवडणुकीची तारिख जशी जवळ येत आहे तशी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर अयोध्येत जाणार आहेत. रामाची पूजा झाल्यानंतर सभा घेणार असल्याचे वृत्त आयबीएन लोकमतने मं. जन्मेजयशराज महाराज यांच्या हवाल्याने दिले आहे. मं. जन्मेजयशराज महाराज हे रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष आहेत.

दुसरीकडे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी कधी जाणार याची तारीख जाहीर करतील. आम्ही तयारीला लागललो आहोत अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येत सभा घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अयोध्येतील राम मंदिरचा मुद्दा शिवसेना येत्या निवडणुकीत घेऊन मैदानात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे. याआधीच उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचं दर्शन घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज मं. जन्मेजयशरण महाराज यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अयोध्या रामजन्मभूमीवर होणारी पूजा आणि त्याठिकाणी होणाऱ्या सभेची तारीख याबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय.

बैठक संपल्यानंतर मं. जन्मेजयशरण महाराज यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन राम मंदिर जन्मभूमीचं दर्शन घेणार आणि पूजा ही करणार आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत सभाही घेणार आहे. तिथेच अवधवासियांच्या सोबत राम मंदिर निर्माण करण्याचं नियोजन केलं जाईल आणि वेळ ठरवली जाईल अशी माहितीही जन्मेजयशरण महाराज यांनी दिली.