News Flash

१०१ वर्षांच्या आजोबांची करोनावर मात, रुग्णालयाने साजरा केला वाढदिवस

करोना, लॉकडाउनच्या काळातली सकारात्मक बातमी

मुंबईत १०१ वर्षांच्या आजोबांनी करोनावर मात केली आहे. ते ज्या रुग्णालयात उपचार घेत होते त्या रुग्णालयाने त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. गोविंद नारिंगरेकर असं या आजोबांचं नाव आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. ज्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १०१ वर्षाच्या या आजोबांनी करोनाशी लढाच दिला नाही तर करोनावर मातही केली. त्यांना मिठाई खाऊ घालत डॉक्टरांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. या क्षणी उपस्थित असलेल्या रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आणि परिचारिकांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. एनडीटीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. मात्र विविध उपाय योजना करुन ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय काय पर्याय अवलंबता येतील त्याचा विचार मुंबईतले डॉक्टर दररोज करत आहेत. करोना झालेला रुग्ण काहीसा घाबरलेला असतो. त्याला नीट समजावून सांगणं, आधार देणं गरजेचं असतं. जे आपले कोविड योद्धे अर्थात डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालय कर्मचारी सातत्याने करत आहेत. अनेकदा नैराश्य, नकारात्मकता ही डॉक्टरांना कोविड योद्धांनाही जाणवू शकते. गेल्या चार महिन्यांपासून हे सगळे याच वातवरणात आहेत. अशा सगळ्यांसाठी असे क्षण हे उभारी देणारे ठरतात. १०१ वर्षांच्या गोविंद नारिंगरेकर या आजोबांना करोनाची लागण झाली. मात्र डॉक्टरांनी दिलेले उपचार आणि सूचना हे ऐकून, वेळेवर गोळ्या आणि औषधं घेऊन या आजोबांनी करोनावर मात केली. ज्यानंतर त्यांचा वाढदिवस साधेपणाने पण एका वेगळ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 11:42 pm

Web Title: after defeating covid19 101 year old patients celebrates his birthday at a hospital in mumbai
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गुड न्यूज! मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के
2 आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, भाजपाचे गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत
3 वसई-विरार पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेकडून घोषणाबाजी, शिवीगाळ
Just Now!
X