News Flash

ओला पाठोपाठ उबर चालकांचाही संप मिटला

ओलाच्या चालकांनी बुधवारी संध्याकाळी संप मागे घेतला.

ओला पाठोपाठ उबरच्या टॅक्सी चालकांनीही संप मागे घेतला आहे. मनसेच्या वाहतूक शाखेने संप मिटल्याची घोषणा केली. मनसेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला होता. घाटकोपर येथील चिराग नगर पोलीस स्थानकात गुरुवारी दुपारी मनसेचे नेते आणि उबरच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ज्या चालकांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेणे तसेच अन्य मागण्यांवर उबरच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे मनसेच्या वाहतूक शाखेचे नेते संजय नाईक यांनी सांगितले.

ओलाच्या चालकांनी बुधवारी संध्याकाळी संप मागे घेतला. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अॅपबेस टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला आणि उबर या दोन्ही कंपन्या अल्पावधीत महत्वपूर्ण ठरल्या आहेत. एकटया मुंबईमध्ये ४५ हजारपेक्षा जास्त अॅप बेस टॅक्सी चालतात असा अंदाज आहे. संप मिटल्यामुळे मुंबईकरांना दिलासा नक्कीच मिळेल. या संपामुळे रोजची ओला-उबरने कामावर जाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 9:46 pm

Web Title: after ola uber strike over
टॅग : Mns,Uber
Next Stories
1 दलितांच्या कल्याणासाठी व सुरक्षेसाठी मोदी सरकार कटिबद्ध – खासदार अमर साबळे
2 बीडमधील गर्भपात प्रकरणात डॉ. शिवाजी सानप यास तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा
3 BLOG : साहेब फक्त ‘झेंडामंत्री’ होऊ नका ; आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांना खुलं पत्र
Just Now!
X