News Flash

पत्नीच्या हत्येनंतर चिमुरडय़ाला नाल्यात फेकले!

पत्नीची हत्या केल्यानंतर दोन वर्षांच्या मुलाला नाल्यात फेकल्याची अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील संगणक अभियंता अंतरा दास मृत्यू प्रकरणी तिच्या मित्रास अटक करण्यात आली आहे

अंधेरी पश्चिमेकडील वायरलेस लेन परिसरात राहणाऱ्या एका इसमाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर दोन वर्षांच्या मुलाला नाल्यात फेकल्याची अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डी. एन. नगर आणि जुहू पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरुवातीला विसंगत उत्तरे देणाऱ्या या इसमाला अखेर अटक करण्यात आली आहे.
वायरलेस लेन परिसरात एका ३० ते ४० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनाजी नलावडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता आठ-दहा दिवसांपूर्वी मृतदेह या परिसरात टाकण्यात आला असावा, अशी माहिती मिळाली. पार्वती धनगर या महिलेचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिचा पती लक्ष्मण याच्याकडे विचारपूस केली असता, आपण ती हरविल्याची तक्रार दिल्याची माहिती पोलिसांना दिली. परंतु त्याच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहून वरिष्ठ निरीक्षक नलावडे यांनी त्याला काही वेळातच बोलते केले आणि त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली.
पार्वतीचे अनैतिक संबंध होते, असा संशय आल्याने त्यांच्यात भांडण झाले आणि त्याने त्याची हत्या केली. त्यावेळी त्याचा सहा वर्षांचा मुलगा तेथेच होता तर दोन वर्षांंचा मुलगा अखिल झोपला होता. त्याला झोपेतच त्याने उचलून घेतले आणि जुहू येथील नाल्यात फेकून दिले.
मध्यरात्री मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र त्यानंतरही संशय येऊ नये म्हणून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात येऊन हरविलेल्या पत्नीचा काही शोध लागला का, याची विचारपूस करीत असे. उपायुक्त सत्यनारायण चौधरी आणि सहायक आयुक्त अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नलावडे यांनी लक्ष्मणला बोलते केले आणि त्याने दोन वर्षांच्या मुलाच्या हत्येचीही कबुली दिली. डी. एन. नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:29 am

Web Title: after wife murdered man threw infant in gutter
Next Stories
1 ध्वनिप्रदूषणग्रस्तांना भरपाई!
2 ‘दिशा डायरेक्ट’चा गुंतवणूकदारांना गंडा
3 २४ विधि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी
Just Now!
X