महाराष्ट्रातील पर्यटन वृद्धीसाठी तसेच पर्यटकांना आकर्षित करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ‘पवन हंस’या हेलिकॉप्टर कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि ‘पवन हंस’च्या प्रतिनिधींनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. राज्याअंतर्गत प्रवासासाठी या सेवेचा वापर केला जाणार असून यातून राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकांना प्रवासासाठी जलद सेवा उपलब्ध होणार आहे.
एलिफंटा तसेच अजिंठा आणि एलोरा लेणी, गणपती पुळे, अ‍ॅम्बी व्हॅली आदी ठिकाणी जाण्या-येण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तिला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या सुविधेमुळे पर्यटकांना हवाई सफर घडवून आणली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी या वेळी दिली.