25 February 2021

News Flash

अंधेरीला न थांबताच पुढे गेली ‘तेजस एक्सप्रेस’, उतरणारे ४२ प्रवासी झाले त्रस्त; नंतर…

पश्चिम रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम रेल्वे मार्गावरील अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकावर थांबा न घेताच पुढे धावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे 42 प्रवासी विनाकारण त्रस्त झाले. याप्रकरणी पश्चिम रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.

रविवारी (दि.२१) अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकातील आपला नियोजित थांबा न घेता पुढे निघून गेली. त्यानंतर पुढे दादर स्थानकामध्ये एक्सप्रेसला तात्काळ थांबा देण्यात आला. अंधेरीला न थांबल्यामुळे नियोजित थांबा नसतानाही दादर स्टेशनवर गाडी थांबवण्यात आली, व अंदाजे 42 प्रवासी उतरले.


अंधेरी स्थानकावर थांबा न घेतल्याचा प्रकार तातडीने अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आला, त्यानंतर पुढे दादर स्थानकामध्ये एक्सप्रेसला तात्काळ थांबा देण्यात आला अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 9:49 am

Web Title: ahmedabad mumbai tejas express skips andheri halt probe ordered sas 89
Next Stories
1 दहावी-बारावी परीक्षांबाबत निर्णय परिस्थितीनुसार
2 दिवसभरात ७६० रुग्ण, चौघांचा मृत्यू  
3 मुंबईतील सर्व रुग्णालये सज्ज
Just Now!
X