26 October 2020

News Flash

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल

उद्यापासून दहा फेऱ्या

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली वातानुकू लित लोकल सेवा १५ ऑक्टोबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसभरात १० फेऱ्या होतील, अशी माहिती दिली. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवासादरम्यान करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वातानुकूलित लोकल बंद ठेवली होती.

१५ ऑक्टोबरपासून एकू ण १९४ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. यामध्ये सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फे ऱ्यांचा समावेश आहे. वातानुकूलित लोकलच्या महालक्ष्मी ते बोरीवली आणि बोरीवली ते चर्चगेट अशा दोन फेऱ्या धिम्या मार्गावर होतील. तर चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा अप-डाऊन मार्गावर मिळून आठ जलद लोकल फेऱ्या होणार आहेत. टाळेबंदीआधी वातानुकू लित लोकलच्या दिवसभरात बारा फेऱ्या होत होत्या. सध्या मेल-एक्स्प्रेस धावत असून त्यातही वातानुकूलित डबे आहेत. यातूनही प्रवासी प्रवास करत असून यामधील वातानुकूलित यंत्रणेचे तापमान नियंत्रणात असते. त्याचप्रमाणे वातानुकूलित लोकलमधील तापमान नियंत्रणात ठेवले जाईल. ही लोकल सॅनिटायजही केली जाणार आहे. प्रवासीही मास्क घालून खबरदारी घेऊन प्रवास करतील असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एकू ण होणाऱ्या १९४ लोकल फेऱ्यांमध्ये ५१ फेऱ्या चर्चगेट ते विरार दरम्यान, बोरीवली ते चर्चगेट दरम्यान ९६, भाईंदर ते विरार दरम्यान ९ फेऱ्या, नालासोपारा ते चर्चगेट दरम्यान १२ फेऱ्या, चर्चगेट ते भाईंदर दरम्यान ९, वसई रोड ते चर्चगेट दरम्यान २ फेऱ्या, वांद्रे ते बोरीवली दरम्यान ८ आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान ८ फे ऱ्या होणार असल्याचे सांगितले. सध्या पश्चिम रेल्वेवर ५०६ लोकल फेऱ्या होत होत्या. नवीन फेऱ्यांची भर पडणार असल्याचे एकूण फेऱ्यांची संख्या ७०० होणार आहे.

मध्य रेल्वेही फेऱ्या वाढवणार

लोकल फेऱ्यांची कमी संख्या, वाढत जाणारे प्रवासी आणि होणारी गर्दी पाहता उच्च न्यायालयाने फेऱ्यांची संख्या प्रत्येकी ७००पर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पश्चिम रेल्वेने नवीन फेऱ्यांची भर पाडताना मध्य रेल्वेनेही लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दरदिवशी ४५३ फे ऱ्या मध्य रेल्वेवर होतात. या फेऱ्या आणखी ७०० पर्यंत वाढवण्यात येतील आणि लवकरच त्याची माहिती दिली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. त्यानुसार २४७ फेऱ्यांची भर पडणार आहे.

मध्य रेल्वेही फेऱ्या वाढवणार

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीची प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता आणि उभ्याने ४ हजार ९३६ प्रवासी प्रवास करू शकतात. टाळेबंदीआधी दररोज होणाऱ्या बारा फेऱ्यांमधून सरासरी १८ हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे आता वातानुकू लित लोकल गाडीला तेवढाच प्रतिसाद मिळेल की त्यापेक्षा कमी असा प्रश्नही असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:20 am

Web Title: air conditioned locomotives on the western railway abn 97
Next Stories
1 ‘आयडॉल’च्या परीक्षांसाठी नव्या कंपनीचा शोध
2 ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’साठी गैरहजर विद्यार्थ्यांना संधी
3 भविष्यात चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र का घेऊ नये!
Just Now!
X