18 February 2019

News Flash

एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे

एअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्रिची विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे. रात्री दीडच्या सुमारास विमानाने एटीसीच्या संरक्षक भिंतीला धडक दिली असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. दरम्यान विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. सुदैवाने विमानातील सर्व 136 प्रवासी सुखरुप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिची विमानतळावरुन विमानाने उड्डाण केलं असता एटीसीच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. विमानात एकूण 136 प्रवासी प्रवास करत होते. वैमानिकाने पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर विमानाचं लँडिंग केलं असून सर्व प्रवाशांना तिथे थांबवण्यात आलं आहे. तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघातानंतर सर्व प्रवासी प्रंचड घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय केली जात आहे. अपघातानंतर मंत्री नटराजन यांनी विमानतळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली. अपघातानंतर विमानाचं नुकसान झालं होतं. मुंबई विमानतळावर विमानाची पाहणी केली असून पुढील उड्डाणासाठी योग्य स्थितीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

First Published on October 12, 2018 7:58 am

Web Title: air india flight crash wall trichi airport