मुंबई महानगरात वायुप्रदूषण करणारी वाहने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरटीओच्या रडारवर येणार आहेत. वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरटीओने घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्यात वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या तपासणीला ३ फे ब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरांमधून विषारी वायू बाहेर पडत असतात. त्यामुळे वायुप्रदूषणात भर पडते. वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्यूशन टेस्ट सर्टिफिके ट- पीयूसी) करणे बंधनकारक के ले आहे. नवीन वाहन खरेदी के ल्यानंतर पीयूसीची मुदत एक वर्षांपर्यंत असते. त्यानंतर दर सहा महिन्यांनी हे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक असते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवण्यासाठी एक समितीची स्थापना के ली आहे. या समितीची बैठक जानेवारी २०२१ च्या अखेरीस पार पडली. त्यात वाहनांची तपासणी करतानाच आरटीओची मदत घेण्याचा निर्णय झाला.

आरटीओचे वायुवेग पथकही कार्यरत राहणार आहे, तर एका कं पनीकडून वायुप्रदूषण यंत्रही पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार वडाळा, अंधेरी, ताडदेव, बोरिवली, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, पेण, वसई या आरटीओकडून ही मोहीम २६ फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे.