10 July 2020

News Flash

मुंबईपेक्षा नवी मुंबई प्रदूषित

देशभरातील ९० शहरांतील प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार नवी मुंबईचा २७ वा क्रमांक असून, मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे.

 

जगभरातील प्रदूषित शहरांत ५१व्या स्थानी

मुंबई : जगभरातील शहरांतील प्रदूषणाबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालात नवी मुंबई हे २०१९ मध्ये राज्यातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे उघड झाले आहे. जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबईचा क्रमांक ५१ वा आहे. तर जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक १६९ आहे.

‘आयक्यूएअर’ या स्वित्र्झलडस्थित संस्थेने २०१९ मधील प्रदूषणाच्या आकडेवारीवर आधारीत तयार केलेला जगभरातील चार हजार पाचशे शहरांचा अहवाल नुकताच प्रकाशित केला. यामध्ये हवेतील पीएम २.५ या घटकाचा आधार घेण्यात आला आहे. अहवालानुसार जगभरातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांपैकी देशातील २१ शहरांचा समावेश होत असून, गाझियाबाद हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे दिसून येते.

राज्यातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असून, हवेतील पीएम २.५ घटकाचे प्रमाण ६१.६ मायक्रोगॅ्रम प्रति घन मीटर इतके असल्याचे आढळले. देशभरातील ९० शहरांतील प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार नवी मुंबईचा २७ वा क्रमांक असून, मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार मुंबईच्या हवेतील पीएम २.५ घटकांचे प्रमाण २०१८ पेक्षा कमी झाले आहे. २०१८ मध्ये पीएम २.५ चे प्रमाण ५८.६ मायक्रोगॅ्रम प्रति घन मीटर इतके होते, ते २०१९ मध्ये कमी होऊन ४३.५ मायक्रोगॅ्रम प्रति घन मीटर इतके झाले आहे. तर जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक १६९ आहे.  ‘गेल्या काही महिन्यात सफरच्या आकडेवारीनुसार नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ होत असताना सातत्याने दिसत आहे, पण त्यावर योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा’, आक्षेप वातावरण संस्थेचे भगवान केसभट यांनी मांडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 1:24 am

Web Title: air pollution mumbai navi mumbai akp 94
Next Stories
1 वातानुकूलित लोकलचे ‘वरातीमागून घोडे’
2 मालमत्ता कराची १६,१६७ कोटींची थकबाकी
3 पालिकेत मराठी भाषेचे वावडे
Just Now!
X