News Flash

वेतन, आमदार निधी, गाडी… अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्र्यांचं आमदारांना बंपर गिफ्ट!

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्री अजित पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना बंपर गिफ्ट दिलं आहे.

अजित पवार

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रावर करोनाचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात सर्वपक्षीय आमदारांचं वेतन ३० टक्क्यांनी कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वच आमदारांना ७० टक्के वेतन मिळत होतं. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना गिफ्ट दिलं आहे. आमदारांचं वेतन येत्या १ मार्चपासून पुन्हा पूर्ववत केलं जाईल, असं अजित पवारांनी विधानसभेत जाहीर केलं. त्यावेळी पूर्ण अधिवेशनात आक्रमकपणे एकमेकांविरोधात उभ्या राहिलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी अर्थमंत्री अजित पवारांच्या घोषणेला दाद दिली!

अजित पवारांच्या महत्वाच्या घोषणा!

विधानसभेत पुरवणी मागण्या मांडताना अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याच्या घोषणेचा देखील समावेश होता. “१ मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षभर आमदारांनी ३० टक्के वेतन सोडलं होतं. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे वेतन पूर्ववत केलं जाईल”, असं अजित पवारांनी जाहीर केलं.

आमदार निधीत १ कोटीची वाढ

दरम्यान, यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी आमदार निधीमध्ये देखील वाढ केल्याचं जाहीर केलं. “करोना काळात स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही. शेवटच्या काळात ३ कोटी रुपये आमदार निधीदेखील सगळ्यांना देण्याची सोय केली. सरकार कुणाचंही असलं, तरी आमदार निधी सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी करोनाचं संकट असलं, तरी आमदार निधी ४ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल”, असं अजित पवार म्हणाले.

“गाड्यांचं फाईलवर करतो!”

आमदारांसाठीच्या गाडीचा मुद्दा यावेळी काही आमदारांनी मांडला होता. त्यावर मिश्किलपणे उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “गाडीसाठी जे करायचंय ते फाईलवर करतो, उगीच सगळ्या महाराष्ट्राला नको कळायला. ड्रायव्हरच्या मागणीवर देखील चर्चा करून ती मान्य केली जाईल!” त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आमदारांसाठी या महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 7:01 pm

Web Title: ajit pawar announces full salary increase in mla fund in budget session pmw 88
Next Stories
1 वाढती रूग्णसंख्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी डोकेदुखी
2 सचिन वाझेंची अडीच तास पोलीस आयुक्तांशी चर्चा; बदलीच्या प्रश्नावर म्हणाले…
3 संजय राऊत म्हणतात, “…म्हणून सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय!”
Just Now!
X