केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवडय़ांत पाच टप्प्यांमध्ये करोनाग्रस्त अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विशेष मदतीची घोषणा केली. पण ‘आत्मनिर्भर भारता’साठी ही मदत पुरेशी आहे का, २० लाख कोटी रुपये नेमके कसे आणि कोणाला मिळणार, त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, अनेक क्षेत्रांना तातडीची मदत हवी आहे याचे काय असे काही प्रश्न उपस्थि होतातच. ‘लोकसत्ता विश्लेषण’ या उपक्रमाच्या पुढील पर्वात अशा अनेक प्रश्नांचा वेध घेतील, विख्यात अर्थविश्लेषक डॉ. अजित रानडे. अर्थविषयक विपुल लिखाण केलेले अजित रानडे म्हणजे कॉर्पोरेट विश्वातील आदरणीय मराठी व्यक्तिमत्त्व. दूरचित्रवाणीवरील तसेच अनेक जाहीर विश्लेषणात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असते. येत्या मंगळवारी सायंकाळी ५ वाजता वेबसंवादाच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

सहभागी कसे व्हाल?

https://tiny.cc/Loksatta_Vishleshan_26May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. अधिक माहितीसाठी  https://www. loksatta.com येथे भेट द्या.