17 October 2018

News Flash

जयंत सावरकर, सुलभा देशपांडे यांना जीवनगौरव

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे जीवनगौरव आणि अन्य विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

| June 5, 2015 05:33 am

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे जीवनगौरव आणि अन्य विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.
mu07नाटय़ परिषदेतर्फे दरवर्षी १४ जून रोजी नाटय़ाचार्य गो. ब. देवल स्मृतिदिन रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता यशवंत नाटय़ संकुल, दादर (पश्चिम) येथे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी सात वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. फैयाज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध ३८ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार आणि पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे-
सवरेत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक), अनिल काकडे (कळत नकळत), सवरेत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक -अद्वैत दादरकर (गोष्ट तशी गमतीची), सवरेत्कृष्ट व्यावसायिक नाटक-कळत नकळत. सवरेत्कृष्ट अभिनेता-संजय खापरे (कळत नकळत), सवरेत्कृष्ट विनोदी अभिनेता-सागर कारंडे (जस्ट हलकं फुलकं), सवरेत्कृष्ट अभिनेत्री-स्पृहा जोशी (समुद्र), सवरेत्कृष्ट नेपथ्यकार-राजन भिसे (समुद्र), सवरेत्कृष्ट प्रकाश योजनकार-जयदीप आपटे (समुद्र), सवरेत्कृष्ट पाश्र्वसंगीतकार- पीयूष-साई (ढॅण्टॅढॅण), सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेता-शशांक केतकर (गोष्ट तशी गमतीची),सवरेत्कृष्ट विनोदी अभिनेत्री-गौरी सुखटणकर (ढॅण्टढॅण), सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री-ज्ञानदा पानसे व सीमा गोडबोले, सवरेत्कृष्ट नाटय़ व्यवस्थापक-मामा पेडणेकर. विशेष लक्षवेधी पुरस्कार-सूर्यकांत गोवळे (कळत नकळत), अभिनयासाठी विशेष पुरस्कार- मंगेश कदम व लीना भागवत (गोष्ट तशी गमतीची) सवरेत्कृष्ट एकपात्री-संदीप पाठक (वऱ्हाड निघालय लंडनला), नाटय़ परिषद कार्यकर्ता पुरस्कार-गुरुनाथ दळवी, नाटय़ समीक्षक पुरस्कार-शीतल कदरेकर, ’सवरेत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक-बया दार उघड, सवरेत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक-संगीत स्वयंवर, सवरेत्कृष्ट प्रायोगिक नाटक-न ही वैरेन वैरानी, ’सवरेत्कृष्ट दिग्दर्शक-प्रायोगिक नाटक-मुकुंद कुलकर्णी व राजकिरण दळी (न ही वैरेन वैरानी), सवरेत्कृष्ट अभिनेता-प्रायोगिक नाटक-हेमंत देशपांडे (न ही वैरेन वैरानी), सवरेत्कृष्ट अभिनेत्री-प्रायोगिक नाटक-सांची जीवने (विठाबाई), सवरेत्कृष्ट गायक अभिनेता-प्रायोगिक नाटक-गुरुप्रसाद आर्चा (लावणी भुलली अभंगाला), सवरेत्कृष्ट गायक अभिनेत्री संगीत नाटक, प्रायोगिक-प्रेरणा दामले (संगीत स्वयंवर), सवरेत्कृष्ट लेखक-प्रायोगिक रंगभूमी- अनिल दांडेकर, सवरेत्कृष्ट लेखक-कामगार रंगभूमी-दत्ता पाटील. सवरेत्कृष्ट रंगभूषा- रवींद्र जाधव, सवरेत्कृष्ट गायक अभिनेता- ऋषीकेश बडवे (कटय़ार काळजात घुसली), सवरेत्कृष्ट गायक अभिनेत्री-सावनी कुलकर्णी (संगीत कुलवधू), नाटय़ परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार-यतिराज वाकळे, निवेदक- दीप्ती कानविंदे, गुणी रंगमंच कामगार पुरस्कार-विष्णू जाधव, वसंत दौड. बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी-लीला रिसबुड-हडप, सुनील शिंदे. सवरेत्कृष्ट प्रायोगिक संस्था- तन्मय (नांदेड), रंगभूमीखेरीज इतर क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यासाठी असलेला रंगकर्मी पुरस्कार-डॉ. परांजपे. लोककलावंत पुरस्कार-दादा पासलकर, शाहीर कालिदास सोनवणे, दत्ता शिंदे, शाहीर कल्याण काळे१४ जून रोजी सकाळी ११ वाजता मराठी हौशी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रथम पुरस्कार विजेते नाटक ‘चिंधी बाजार’, तर दुपारी तीन वाजता ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

First Published on June 5, 2015 5:33 am

Web Title: akhil bharatiya marathi natya parishad awards