अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांची निवड केली आहे. पुरस्कार प्रदान सोहळा १४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात होणार आहे.

सर्वोत्कृष्ट लेखक, अभिनेत्री, पाश्र्वसंगीत, रंगभूषा या पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकाचा पुरस्कारासाठी ‘सोयरे सकळ’ या भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या नाटकाची निवड करण्यात आली आहे.

यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक) पुरस्कारासाठी डॉ. समीर कुलकर्णी (सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंगेश कदम (गुमनाम है कोई!), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुमित राघवन (हॅम्लेट), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळये (हॅम्लेट), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रदीप मुळये (गुमनाम है कोई!), सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीत अजित परब (सोयरे सकळ) यांची निवड झाली आहे.

सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार सचिन वारीक (सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सतीश राजवाडे (अ परफेक्ट मर्डर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री माधुरी गवळी (एपिक गडबड), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आशिष पवार ( गलती से मिस्टेक), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री नंदिता पाटकर (आमच्या हीचं प्रकरण) आणि विशेष लक्षवेधी या पुरस्कारासाठी मधुरा वेलणकर (गुमनाम है कोई!) यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक पुरस्कारासाठी ‘नाटय़संपदा कला मंच‘ संस्थेच्या ‘संगीत चि.सौ.कां. रंगभूमी’, सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता पुरस्कारासाठी आजगावकर (संगीत संत तुकाराम), सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री पुरस्कारासाठी शमिका भिडे (संगीत चि.सौ.कां. रंगभूमी) यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी आविष्कार, मुंबई आणि प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक या पुरस्कारासाठी प्रदीप वैद्य (काजव्यांचा गाव) यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट हौशी नाटकासाठी अव्याहत (संस्था-हंस संगीत नाटय़ मंडळ, फोंडा), सर्वोत्कृष्ट हौशी संगीत नाटकासाठी संगीत संत गोरा कुंभार (संस्था – राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली आहे.