मुंबईचं महत्त्व १९ व्या शतकात जगभरात इतकं वाढलं होतं की जगभरातली प्रत्येक महत्त्वाची गोष्ट तीन ते चार वर्षांमध्ये मुंबईत दाखल होत असे. तत्वज्ञान व ज्ञानभांडाराचा विस्तारही याला अपवाद नव्हतं. अमेरिकेमध्ये स्थापन झालेली थिऑसॉफिकल सोसायटीही दोन तीन वर्षात मुंबईत आली. अॅनी बेझंट या भारताच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अॅनी बेझंट या संस्थेत होत्या आणि या संस्थेची वास्तू भारतीयांना आजही अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टींची साक्षीदार आहे.