28 October 2020

News Flash

सर्वच बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा!

सर्व  बँकांमधील १० टक्के  कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासाच्या निर्बंधातून सहकारी आणि खाजगी बँकाना वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुंबई महानगर प्रदेशातील  सर्व  बँकांमधील १० टक्के  कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

टाळेबंदी शिथिल के ल्यानंतर सरकारने राज्य सरकारी, पोलीस, आरोग्य सेवेतील तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा दिली असून केंद्र सरकारी, रेल्वे तसेच राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र सहकारी आणि खाजगी बँका अत्यावश्यक सेवेत येत असतानाही त्यांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली नव्हती. महानगर प्रदेशात राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा सहकारी आणि खाजगी बँकांची संख्या अधिक असून हजारो कर्मचारी या बँकांमध्ये काम करीत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्याने बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असून सहकारी-खाजगी बँक कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची मागणी सातत्याने के ली जात होती. त्याची दखल घेत अखेर महानगर प्रदेशातील सर्व सहकारी आणि खाजगी बँकांच्या १० टक्के  कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा द्यावी असे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत.  त्यानुसार या निवडक १० टक्के  कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्टेशन प्रवेशासाठी राज्य सरकारकडून लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा, तोवर बँके च्या ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. त्यासाठी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडक्या उघडण्यात येणार असल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 2:02 am

Web Title: all bank employees allowed to travel by local train zws 70
Next Stories
1 मुंबई पालिकेच्या उत्पन्नात ४१ टक्क्य़ांची घट
2 निर्बंध शिथिल झाल्यानंतर कृषी पर्यटन केंद्रे, रिसॉर्टकडे ओढा
3 एसटी पूर्ण क्षमतेने चालविण्यास विरोध
Just Now!
X