मुंबई : राज कुंद्रा यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना २५ लाख रुपयांची लाच देऊन अटक टाळली, असा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबतचे चार ई-मेल लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाला करण्यात आले होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.

न्यूफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडेही २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे या ई-मेलमध्ये म्हटले आहे. न्यूफ्लिक्स हे अ‍ॅप यश ठाकूर चालवत होता, असा आरोप आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू होती. कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज कुंद्रा याने २५ लाख रुपये पोलिसांना दिले, असेही या ई-मेलमध्ये म्हटले होते. दरम्यान पुढील चौकशीसाठी या तक्रारी एप्रिल महिन्यात मुंबई पोलिसांकडे पाठविल्या होत्या, अशी माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.