News Flash

‘गर्दीच्या वेळीही वकिलांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्याचा विचार करा’

वकिलांच्या नव्या मागणीची मुख्य न्यायमूर्ती दत्ता आणि कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दखल घेतली.

उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयांच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाल्याने वकील आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या वेळीही उपनगरी रेल्वेगाडय़ांमधून प्रवासास मुभा देण्याची मागणी वकिलांच्या संघटनेने उच्च न्यायालयाकडे केली आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयांच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाल्याने वकील आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या वेळीही उपनगरी रेल्वेगाडय़ांमधून प्रवासास मुभा देण्याची मागणी वकिलांच्या संघटनेने उच्च न्यायालयाकडे केली आहे.

वकिलांना सध्या सकाळी आठच्या आधी आणि ११ नंतर रेल्वे प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, वकिलांच्या नव्या मागणीची मुख्य न्यायमूर्ती दत्ता आणि कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दखल घेतली.

तसेच त्यांना आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या वेळीही रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

टाळेबंदीच्या आठ महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयात अखेर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. उच्च न्यायालयातील ही प्रत्यक्ष सुनावणी सद्य:स्थितीला प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यातच प्रत्यक्ष सुनावणीचे आदेश जारी होताच प्रत्यक्षसोबत दूरचित्रसंवादाच्या माध्यमातील सुनावणीही सुरू ठेवण्याची तातडीची मागणी वकिलांकडून के ली जात आहे. आपले प्रकरण पुकारले जाईपर्यंत वकील न्यायदालनाच्या बाहेरच थांबत आहेत.

न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे न्यायदालनाच्या बाहेरही शरीराचे तापमान तपासल्यावर वकील तसेच याचिकाकर्त्यांना आत सोडले जात होते. प्रत्येकाने मुखपट्टी लावली आहे ना याची जातीने पाहणी के ली जात होती. न्यायदालनाच्या प्रवेशद्वाराजवळ जंतुनाशकाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. करोनासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून न्यायमूर्ती आणि वकिलांच्या मधल्या भागात प्लास्टिकच्या पारदर्शक भिंती (प्लॅस्टिक फ्लेक्सी) बसवण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 12:49 am

Web Title: allow lawyers to travel by train in rush time dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भय बॉलीवूडमधले संपत आहे..
2 महालक्ष्मी पुलासाठी १९९ झाडांवर कुऱ्हाड?
3 बार कौन्सिलचे नोंदणी शुल्क दुप्पट
Just Now!
X