राज्य सरकारने रेस्तराँ खुली ठेवण्याची मर्यादा आणखी दोन तासांनी वाढवण्याची मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने (एचआरएडब्ल्यूआय) केली आहे.
टाळेबंदीमुळे आठ महिने व्यवसाय बुडाला आहे. यातून सावरण्यासाठी रात्री दीडपर्यंत रेस्तराँ खुली ठेवण्यास परवानगी दिल्यास व्यावसायिकांच्या राज्यभरातील उत्पन्नात दरदिवशी ५० ते ७५ कोटींची वाढ होईल, अशी आशा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
करोना आणि टाळेबंदीमुळे रेस्तराँ व्यावसायिकांना मागील आठ महिन्यांत मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. सद्य:स्थितीत सरकारने रात्री ११.३० पर्यंत हॉटेल खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे.
म्हणणे काय?
‘सद्य:स्थितीत हॉटेल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री नऊ वाजल्यानंतरच बहुतांश ग्राहक जेवणाकरिता येतात. मात्र ५० टक्क्यांच्या बंधनामुळे सर्वासाठी टेबल उपलब्ध होत नाही. त्यातून अनेक ग्राहकांना परत पाठवावे लागते. सर्व ग्राहकांना सेवा देण्यासाठी करोनापूर्वीच्या काळाप्रमाणे मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एचआरडब्ल्यूआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 12:40 am