News Flash

अमन लॉज-माथेरान मिनी ट्रेन आजपासून सुरू

माथेरानची मिनी ट्रेन पाच महिन्यांनंतर शुक्रवार, २७ डिसेंबरपासून पुन्हा सेवेत येत आहे.

नेरळ ते माथेरान सेवेसाठी अद्याप प्रतीक्षा

मुंबई : माथेरानची मिनी ट्रेन पाच महिन्यांनंतर शुक्रवार, २७ डिसेंबरपासून पुन्हा सेवेत येत आहे. प्रथम अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू होत असून, नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शटल सेवेमुळे माथेरानमधील स्थानिक आणि पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

यंदा झालेल्या मुसळधार पावसात नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन मार्गाला मोठा फटका बसला. २२ ठिकाणी रुळाखालील खडी वाहून जाण्यासह अन्य समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून मध्य रेल्वेने मिनी ट्रेन बंद केली. मात्र माथेरानमधील स्थानिक आणि पर्यटकांची गैरसोय होत असल्याने किमान अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू करण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे शटल सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने विविध कामे पूर्ण करण्यावर भर दिला. अखेर २७ डिसेंबरपासून शटल सेवा सुरू करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मिनी ट्रेनला द्वितीय श्रेणीचे तीन डबे, प्रथम श्रेणीचा एक डबा आणि दोन बॅरेक व्हॅन जोडले आहेत.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा

स. ८.४० वा., स. ९.५५ वा., स. १०.४५ वा., स. ११.५५ वा., दु. १२.४५ वा., दु. २.०० वा., दु. ३.०५ वा., दु. ३.५५ वा., तर शनिवार-रविवार सायं. ४.४५ वा. आणि ५.३५ वा.

माथेरान ते अमन लॉज शटल सेवा

स. ८.१५ वा., स. ९.३० वा., स. १०.२० वा., स. ११.२५ वा., दु. १२.२० वा., दु. १.३५ वा., दु. २.४० वा., दु. ३.३० वा., शनिवार-रविवार सायं. ४.२० वा. आणि सायं. ५.१० वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:07 am

Web Title: aman lodge to matheran mini train starts today zws 70
Next Stories
1 म्हाडा ‘बृहद्सूची’वरील सव्वाशे देकार पत्रे रद्द होणार?
2 करमाफीच्या घोळामुळे २.२० लाख मालमत्ताधारक देयकांपासून वंचित
3 ग्रहणात उत्साह नांदतो..
Just Now!
X