विधानसभेप्रमाणेच पालिका निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला भरभरून प्रतिसाद द्या, असे आवाहन करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी संध्याकाळी येथे पत्रकार परिषदेत शहराच्या विकासाची हमी देत असल्याचे आश्वासन दिले. पालिका निवडणुकीनिमित्त  िप्रचार मोहिमेचा आढावा घेतला.     पालिकेत अवघा एक नगरसेवक असूनही विधानसभा निवडणुकीत अंबरनाथमध्ये भाजपच्या उमेदवारास विजयासाठी अवघी १८०० मते कमी पडली. तोच विश्वास पालिका निवडणुकीतही कायम ठेवा, भाजप अंबरनाथचा घोटाळेमुक्त विकास करेल, असेही  सांगितले. गेली २० वर्षे सेनेसोबत सत्तेत असल्याने शहरातील विकास कामे रखडण्यात भाजपही जबाबदार नाही का, या प्रश्नावर पालिकेत भाजपचे अस्तित्व नगण्य होते. त्यामुळेच आता स्वतंत्रपणे निवडून देण्याचे आवाहन केले.