*सलग तिसऱ्या वर्षी भारतीय लेखक अव्वल

*‘अ‍ॅमेझॉन’चा ऑनलाइन अहवाल प्रसिद्ध

युवापिढीची नस ओळखून त्यांच्याच भाषेत पुराकथांची पुनर्माडणी करून अवघ्या काही कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या अमीष त्रिपाठी यांचे ‘स्किऑन ऑफ इक्ष्वाकू’ हे पुस्तक यंदाचे ‘बेस्ट सेलर’ ठरले. यामुळे सलग तिसऱ्या वर्षी भारतीय लेखक बेस्ट सेलरच्या यादीत झळकले आहेत.

‘अ‍ॅमेझॉन’ने २०१५ च्या सर्वाधिक ऑनलाइन पुस्तक विक्रीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यात साहित्यविश्वात नव्याने पदार्पण केलेल्या अमीष त्रिपाठी यांनी नव्या पिढी लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतन भगत यांना मागे टाकत अधिक पुस्तक विक्रीचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. यंदाच्या वर्षांत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये काही कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या आणि प्रचंड विक्रीचे विक्रम नोंदवलेल्या पाच पुस्तकांची नावे ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाइन बाजारातील अग्रगण्य कंपनीने प्रसिद्ध केली आहेत. यात अमीष त्रिपाटी यांचे ‘स्किऑन ऑफ इक्ष्वाकू’ पहिल्या क्रमांकावर, चेतन भगत यांचे ‘मेकिंग इंडिया ऑसम’ हे दुसऱ्या, दुरजॉय दत्ता यांचे ‘वर्ल्ड बेस्ट बॉयफ्रेंड’ तिसऱ्या, तर सुदीप नागरकरांचे ‘यू आर ट्रेिडग इन माय ड्रम’ आणि ट्िंवकल खन्नांचे ‘मिसेस फनिबोन्स’ ही पुस्तके अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकांवर आहेत. याशिवाय माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘िव्हग्स ऑफ फायर’ हे पुस्तक या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

याच जोडीला ‘अ‍ॅमेझान’ने सर्वाधिक पुस्तक वाचल्या जाणाऱ्या शहरांची नावेही प्रसिद्ध केली आहेत. यात दिल्ली पहिल्या क्रमांकावर, बंगळुरू दुसऱ्या, मुंबई तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या तर चेन्नई पाचव्या क्रमांकांवर आहे. तर विद्य्ोचे माहेर घर असलेले पुणे शहर सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरात वाचन संस्कृती झपाटय़ाने वाढत आहे. ही बाब दरवर्षी ‘अ‍ॅमेझॉन’च्या अहवालात स्पष्ट होत आहे. यात भारतीय लेखक सलग तिसऱ्या वर्षी ‘बेस्ट सेलर’च्या यादीत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे भारताचे अ‍ॅमेझॉनचे संचालक वर्ग व्यवस्थापक नूर पटेल यांनी सांगितले