मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज रविवारी विवाहबंधनात अडकले. ‘राज’पुत्राच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

काल संध्याकाळी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पार पडला. दोन दिवसांपासून कृष्णकुंज इमारतीला आणि इतर परिसराला रोषणाई करण्यात आली आहे. कृष्णकुंज इमारतीला फुलांचीही सजावट करण्यात आली आहे.

लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे अमित ठाकरे – मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा पार पडला. नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली आहे. उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, रतन टाटा, बाबासाहेब पुरंदरे, जयदेव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.

गेल्याच वर्षी गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा पार पडला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. ओळखीचे मैत्रीत आमि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.