News Flash

अमित शाहांचं मुंबईत आगमन; विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक?

आज सरकारचा विश्वासदर्शक ठराव पास झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यातील राजकारण आणि रणनीती याबाबत चर्चा करण्यासाठी शाह मुंबईत दाखल झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव पास झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्याच्या विधिमंडळात आज नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव चाचणी जिंकली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर आल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

आज सरकारचा विश्वासदर्शक ठराव पास झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यातील राजकारण आणि रणनीती याबाबत चर्चा करण्यासाठी शाह मुंबईत दाखल झाल्याचे बोलले जात आहे. शाह यांच्या आगमनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:31 pm

Web Title: amit shah arrives in mumbai bjp meeting on the back of floor test at assembly aau 85
Next Stories
1 महाविकास आघाडीच्या सरकारने १६९-० फरकाने जिंकला विश्वासदर्शक ठराव
2 उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलं पहिलं भाषण; जनतेचे मानले आभार
3 Maharashtra Assembly floor test : उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव
Just Now!
X