News Flash

पर्जन्य वृक्षांच्या संरक्षणार्थ अमित ठाकरे यांची धाव

दादरच्या शिवाजी पार्कमधील मरणपंथाला लागलेल्या पर्जन्य वृक्षांच्या रक्षणासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी धाव घेतली.

| February 15, 2015 02:51 am

दादरच्या शिवाजी पार्कमधील मरणपंथाला लागलेल्या पर्जन्य वृक्षांच्या रक्षणासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी धाव घेतली. पर्जन्य वृक्षांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या ‘मिली बग’चा बंदोबस्त करण्यासाठी बंगळुरूहून आणलेले ‘लेडी बग’ अमित ठाकरे यांनी शनिवारी सकाळी वृक्षांवर सोडले.
मुंबईमधील पर्जन्य वृक्ष अचानक मरणपंथाला लागल्यामुळे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी आवाज उठविला होता. त्यानंतर प्रशासनाने पर्जन्य वृक्षांच्या मृत्युमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिली बग कीडय़ांमुळे पर्जन्य वृक्ष मरणपंथाला लागल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पालिकेने औषध फवारणी सुरू केली. मात्र ही औषध फवारणी निष्फळ ठरू लागली आहे. ‘लेडी बग’चे ‘मिली बग’ खाद्य असून त्यामुळे पर्जन्य वृक्षांचे संवर्धन होऊ शकेल, असे वृक्ष तज्ज्ञांचे मतआहे. त्यामुळे मनसेने पर्जन्य वृक्षांच्या रक्षणासाठी त्यावर ‘लेडी बग’ कीडे सोडण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2015 2:51 am

Web Title: amit thackeray son of raj thackeray to conserve trees in mumbai
Next Stories
1 शिक्षकास अटक
2 ‘एमईटी’च्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी
3 आज ठरणार ‘वक्ता दशसहस्रेषु’!
Just Now!
X