News Flash

महानायक अमिताभ बच्चन करोना पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल

अभिषेक बच्चनही रुग्णालयात

महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांनारुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे.

 

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

करोनाची लागण आता महानायक अमिताभ बच्चन यांनाही झाली आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचवेळी त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र सुरुवातीला बच्चन कुटुंबीयांकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आता अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करुन ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?

अमिताभ बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र त्यांना करोनाची लक्षणं नाहीत.  त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली काळजी

अमिताभ बच्चन यांना करोना झाल्याचं समजताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजी व्यक्त केली आहे. तसंच लवकर बरे व्हा अशा सदिच्छाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 10:38 pm

Web Title: amitabh bachchan admitted to nanavati hospital his covid test positive scj 81
Next Stories
1 ऑनलाइन संगीत विश्वात नव’चैतन्य’ आणणारा अवलिया
2 मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
3 सुशांतच्या चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली; रस्त्याला व चौकाला दिलं सुशांतचं नाव
Just Now!
X