भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या ऑस्ट्रेलियाचे सरकार आणि इतर संस्था खूपच खूश असल्याचे चित्र आहे.लिटील मास्टरसचिन तेंडुलकर याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाया पुरस्काराने सन्मानित करणाऱया ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अमिताभ बच्चन यांचाही सन्मान केला.
सात हिंदुस्तानीया चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱया अमिताभ बच्चन यांनी 1969 पासून चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.वयाच्या सत्तरीतही पा’, ‘चिनी कमअशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांत अभिनय करणाऱया अमिताभ बच्चन यांना परदेशात भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहराम्हणून ओळखतात.ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमधील संबंध दृढ करण्यातही त्यांचे योगदान आहे.या सर्वाचा विचार करून ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मानानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला.हिंदी चित्रपटसृष्टीचे शतकमहोत्सवी वर्ष आणि ऑस्ट्रेलिया व भारत या दोन देशांमधील संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने आपण केलेले प्रयत्न यांसाठी ऑस्ट्रेलिया सरकार आणि त्यांच्या मुंबईतील उच्चायुक्तालयाने पुन्हा एकदा माझा सन्मान केला.या सन्मानामुळे मला पुन्हा एकदा खूप आनंद झाला आहे’, असे बच्चन यांनी लिहीले आहे.गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांना ब्रिस्बेनमधील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती.