News Flash

वाहतूक नियमभंग दंडाच्या रकमेत वाढ

मुंबई वाहतूक पोलिसांनी या दंडाच्या आकारणीस सुरुवात केली आहे.

मोटार वाहन अधिनियम २०१५ पारित केल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी या कायद्यातील सुधारित दंड रक्कम आकारण्यास सुरुवात केली आहे. यापुढे विनाहेल्मेट प्रवास करणारा चालक आणि सहप्रवासी यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असून वेगमर्यादा न पाळल्यास १००० रुपये, बेजबाबदारपणे वाहन चालवून दुसऱ्याच्या जिवाला धोका पोहोचविल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोटार वाहन गुन्ह्य़ांमधील दंडाची रक्कम अत्यल्प असल्याने तो मोडण्याची प्रवृत्ती बळावल्याचे निरीक्षण अनेक तज्ज्ञांनी मांडले होते. त्यामुळे ही रक्कम वाढविण्याची मागणी जोर धरत होती. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशात सुधारित मोटार वाहन अधिनियम २०१५ पारित करण्यात आला. त्यामुळे दंडाच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या दंडाच्या आकारणीस सुरुवात केली आहे.

दुचाकीसाठी दंड

  • गुन्ह्य़ाचा प्रकार – दंडाची जुनी रक्कम – नवी रक्कम
  • विनाहेल्मेट (चालक व सहप्रवासी यांना प्रत्येकी) – १०० रु – ५०० रु
  • तिघांनी प्रवास करणे – १०० रु – २०० रु
  •  चारचाकी गाडय़ांसाठी दंड
  • गुन्ह्य़ाचा प्रकार – दंडाची जुनी रक्कम – नवी रक्कम
  • काचेला काळी फिल्म लावणे – १०० रु – २०० रु
  • आसनपट्टी न लावणे – १०० रु – २०० रु

chart

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 2:45 am

Web Title: amount of traffic penalty increased
Next Stories
1 राजभवनात १५० मीटर लांबीची ब्रिटिशकालीन बराक सापडली!
2 ‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी
3 जातचोरी प्रकरण : तक्रार दाखल होण्याआधीच विद्यार्थी फरारी
Just Now!
X