३१ डिसेंबरनिमित्त मुंबईसह सगळा देश आणि जगच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. सोशल मीडियावरही शुभेच्छांची देवाणघेवाण होते आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अगदी अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी त्यांचा एक खास फोटो ट्विटरवर ट्विट केला आहे. त्या फोटोत त्या एक बंदुक घेऊन उभ्या आहेत. नव्या वर्षासाठी जो संकल्प कराल तसंच तुमचं वर्ष जाईल, आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा असे सांगत अमृता फडणवीस यांनी अगदी अनोख्या आणि वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस बंदुकीतून निशाणा साधत आहेत असा हा फोटो आहे. आपलं जे लक्ष्य आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा आणि त्या अनुषंगानेच तयारीला लागा असेच त्या सांगत आहेत.
#Wish u a very happy 2019 … What the New Year Brings to you will depend a great deal on what you bring to the New YEAR … let the adventure begin … shoot ur best version !! #HappyNewYear2019 #HappyNewYear #NewYear2019 pic.twitter.com/pxuToCCmmF
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 31, 2018
काही नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्या फोटोवर टीका केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी या फोटोचं कौतुक केलं आहे. मात्र माझे निर्णय मी घेत असते त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरू नका असे अमृता फडणवीस यांनी याआधीही सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही नेमकी हीच भूमिका मांडली आहे. तुमच्या लक्ष्यावर केंद्रीत करा आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करा असे म्हणत त्यांनी सगळ्यांनाच हॅपी न्यू इयर म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 8:57 pm