News Flash

मुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडली

एअर होस्टेस गंभीर जखमी

एअर इंडिया (फाईल फोटो)

मुंबई विमानतळावर आज एक धक्कादायक प्रकार घडला. आज सकाळच्या सुमारास मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस खाली पडल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा धक्कादायक प्रकार घडला. एअर इंडियाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-दिल्ली एआय ६४ या विमानाच्या उड्डाणादरम्यान ही दूर्घटना घडली. मुंबईहून दिल्लीच्या दिशेने झेपावण्यासाठी विमान रन-वेवर धावू लागले. त्याचवेळी विमानाचा दरवाजा बंद करताना ५३ वर्षीय एअर होस्टेस दरवाजामधून खाली पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तोल गेल्याने ही एअर होस्टेस धावपट्टीवर पडल्याचे समजते. या संदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटवरून दिली आहे.

दूर्घटनेनंतर विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. या अपघातामध्ये एअर होस्टेस गंभीर जखमी झाली असून तिला मुंबईतील नानावती रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. एअर इंडिया कंपनीने अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत महिती दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 9:51 am

Web Title: an air india air hostess fell off a mumbai delhi flight
Next Stories
1 मस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
2 शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका
3 धक्कादायक..! तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना
Just Now!
X