09 March 2021

News Flash

कॅश व्हॅनच्या सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

२२ नोव्हेंबरला घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मुंबई : कांदिवली येथे बँकेत कॅश घेऊन जाण्याऱ्या कॅश व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाला पिस्तुलाचा धाक दाखवून कॅश लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कांदिवली भागात एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी निघालेल्या कॅश व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला होता. २२ नोव्हेंबरला घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातील विजया बँकेच्या शाखेत कॅश व्हॅनद्वारे पैसे भरण्यासाठी गेलेल्या पथकातील एका सुरक्षा रक्षकाला दोन तरुणांनी आपल्याकडील बंदुकीचा धाक धकवून कॅश लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसला आणि दोघेही लुटारू पळून गेले. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.

२२ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. मात्र, कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा अथवा त्यांचे कोणतेही नुकसान न झाल्यामुळे यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. त्यामुळे हे चोरटे कोण होते याची माहिती कळू शकली नाही. मात्र, समतानगर पोलिसांनी ही घटना समजताच त्यांनी कॅश व्हॅनच्या कर्मचऱ्यांना बोलावून यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवून घेतली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 10:33 am

Web Title: an attempt to rob a cash van with a gunshot wreck is unsuccessful 2
Next Stories
1 ठाण्यातील महिलेचा न्यूझिलंडमध्ये संशयास्पद मृत्यू
2 सरकारच्या नकारघंटेमुळे काळ्या पैशाचे गूढ वाढले: शिवसेना
3 कांजूरच्या कचराभूमीवर दुप्पट भार
Just Now!
X