01 December 2020

News Flash

मुंबईजवळच्या परिसराला भूकंपाचे हादरे; उत्तरेला होता केंद्रबिंदू

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत भूकंपाची मालिका सुरू असून, गेल्या आठवड्यात गुजरामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. मुंबईजवळच्या परिसरात उत्तरेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केद्रानं ही माहिती दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईपासून १०३ किलोमीटर उत्तर दिशेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले.

मागील महिनाभरापासून दिल्लीमध्ये लागोपाठ भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यांची तीव्रता कमी असली, तरी लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिल्लीमध्ये हादरे जाणवत असताना गेल्या आठवड्यात गुजरामध्येही भूकंपाची नोंद झाली आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे सातत्याने आठ हादरे जाणवले होते. पहिला हादरा २.० रिश्टरचा, त्यानंतर लगेच १८ मिनिटांनी वाजता २.३ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. तिसरा ८ वाजून ४५ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केलचा, तर ८ वाजून ४७ मिनिटांनी २ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० मार्च रोजी पहाटे चार धक्के बसले होते. मध्यरात्री १ च्या सुमारास २.८ रिश्टर स्केलचा आणि त्यानंतर पहाटे २.७ रिश्टर स्केलचा त्यानंतर पावणेदहा वाजेपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 1:25 pm

Web Title: an earthquake of 2 5 magnitude was recorded near north of mumbai bmh 90
Next Stories
1 Video : मिनी गेट वे ऑफ इंडिया बघायचाय?
2 राज्यात वाढीव १३२८ करोनाबळी उघड
3 रेल्वे प्रवासी रांगात्रस्त
Just Now!
X