स्वतःचे हक्काचे घर असावे असे कुणाला वाटत नाही? मात्र आपल्या हक्काच्या घरासाठी धडपड करणाऱ्या सामान्यांना ६८ लाखांना गंडा घालणाऱ्या तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या तीन संचालकांवर कस्तुरबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  क्रिएटिव्ह डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बर्डे, दत्तात्रय बर्डे आणि नरेंद्र बर्डे यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल करून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

माधव मोनजी मंगे (वय 65) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगे हे एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत काम करत. 1194 मध्ये त्यांची ओळख मेसर्स क्रिएटिव्ह डेव्हलपर्स, प्रमोटर्स अँड बिल्डर्स कंपनीचे संचालक राजेंद्र बर्डे, दत्तात्रय बर्डे आणि नरेंद्र बर्डे यांच्याशी झाली. त्यांनी बोरिवलीत मागाठाणे, दत्तपाडा रोडवरील,राजेंद्र नगर सीटीएस क्र ८१/८८ हा प्लॉट पुनर्विकासासाठी घेण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्यावेळी राजेंद्र नगर प्रकल्पाची माहिती देण्यात आली . एसआरए प्रकल्पांतर्गत विकसित करून त्याठिकाणी सात मजल्याचे चार विंगचे बांधकाम करण्यात येणार आहे. जागेवरील मूळ मालकांना स्वस्त किंमतीत घरे देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावेळी संचालक बर्डे यांनी मूळ मालकांचे संयुक्त बँक खाते काढले. त्यांच्यातील करारानुसार एकूण क्षेत्रफळाची सदनिका ९०० रुपये प्रति चौरसफूट प्रमाणे ५ लाख ८ हजार ५०० रुपये देण्यात येईल असे नमूद केले. सदरचा प्रकल्प पसंत पडल्याने या प्रकल्पात १२० कर्मचाऱ्यांनी सदनिका घेण्याचे निर्णय घेतला. प्रत्येक सभासदाकडून साडेतीन ते पावणेचार लाख रुपये घेतल्यानंतरही कुठलेच काम सुरु झाले नाही. सभासदांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. कंपनीकडून मात्र सभासदांना प्रतिसाद मिळत नव्हता.

२०११ मध्ये सभासदांनी ट्रयुली क्रिएटिव्ह कंपनीला सदनिकांबाबत एक नोटीस पाठविली त्यावर कुठलेच उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे अखेर सभासदांनी २०१२ मध्ये ग्राहक मंचाकडे तक्रार केली. मंचाने संबंधितांना दोन महिन्यात त्यांच्या सदनिका ताब्यात देण्याचे आदेश दिले. आदेशाला न जुमानता बांधकाम कंपनीने १६ सप्टेंबर २०१६ रोजी आदेशांविरोधात कंपनीने राष्ट्रीय ग्रहक मंचाकडे अपील केले. एसआरए प्रकल्पाबाबत विभागाकडून चुकीची माहिती दिल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. या त्रिकुटाने तब्बल २५ पेक्षा जास्त सभासदांना कमी किमतीत घरे देण्याचे अमिष दाखवून १९९४ ते २००० या कालावधीत प्रत्येक सभासदाकडून सुमारे ६८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे आणि फसवणूक केल्याचे समोर आल्याने अखेर माधवजी मंगे सह अनेकांनी लेखी तक्रारअर्जाद्वारे केली. तक्रारीची शहानिशा करून पोलिसांनी राजेंद्र,दत्तात्रय, आणि नरेंद्र बर्डे या तिन्ही भावांविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा कस्तुरबा पोलीस ठाण्यात दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.