News Flash

चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आकर्षित करण्याची महाराष्ट्राची क्षमता!

‘लोकसत्ता’च्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ परिषदेत उद्योगपती आनंद महिंद्र यांचे प्रतिपादन

इंडियन एक्स्प्रेस समूहाचे संचालक अनंत गोएंका यांनी उद्योगपती आनंद महिंद्र यांचे रेखाचित्र देऊन स्वागत केले.

अमेरिका आणि चीनमध्ये दिवसागणिक बिघडत असलेल्या आर्थिक संबंधांमुळे चीनमधील अनेक कंपन्या आपले प्रकल्प इतर देशांत हलविण्याचा विचार करत असून, त्यांना आकर्षित करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. ही ऐतिहासिक संधी साधून  महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात उसळी मारावी, असे प्रतिपादन विख्यात उद्योगपती आणि ‘महिंद्र अँड महिंद्र उद्योग समूहा’चे प्रमुख आनंद महिंद्र यांनी सोमवारी लोकसत्ताच्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या एकदिवसीय परिषदेत केले.

या परिषदेत आनंद महिंद्र यांच्याशी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी संवाद साधला. ट्विटरच्या वापरापासून औद्योगिक आव्हानांपर्यंत अनेक विषयांवर महिंद्र यांनी दिलखुलास उत्तरे दिली. महाराष्ट्राशी असणारे नातेही त्यांच्या बोलण्यातून उलगडले. आगामी काळात महाराष्ट्राने विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती, मनोरंजन क्षेत्र, नैसर्गिक किंवा सेंद्रिय उत्पादन निर्मिती क्षेत्र; या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे जागतिक अर्थकारणातील महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी नव्हे तर जगातील इतर देशांशी केली जाते. त्यामुळेच चीनमधून बाहेर पडणाऱ्या या कंपन्यांना विशेष आर्थिक क्षेत्र उभे करून आकर्षित केले पाहिजे.

प्रायोजक.

लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:28 am

Web Title: anand mahindra on maharashtra business loksatta advantage maharashtra abn 97
Next Stories
1 रेल्वेमार्गावरील १६ पुलांचा भार हलका करणार
2 गणेशोत्सवावरही मंदीचे मळभ?
3 महापालिकेच्या आठ शिलेदारांमुळे कोल्हापूरकरांची तहान भागली
Just Now!
X