राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची तयारी राज्य सरकारने केल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि मृतांचा आकडा या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन Anand Mahindra यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परखड बोल सुनावले आहेत. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं”, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. विरोधकांकडून देखील राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याला विरोध केला आहे.

मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला!

bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन
punjab cm bhagwant maan may arrest
अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

आपल्या ट्वीटमधून आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देखील दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

anand mahindra tweet
आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परखड बोल सुनावले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नुकतीच आरोग्य विभागातील आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन संदर्भात सूचना केल्या आहेत. “जर नागरिकांकडून सातत्याने कोविड संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल, तर लॉकडाऊनसारख्याच निर्बंधांची तयारी सुरू करा”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एक कोटी लोकांना पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा; भाजपाची मोठी मागणी

भाजपाचा विरोध

विरोधकांकडून या मुद्द्यावर टीका केली जात आहे. “लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. एक वर्ष लोकं कसे जगले, हे मातोश्रीमध्ये राहून समजणार नाही. लॉकडाऊन कराचाच असेल, तर राज्य सरकारने हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये द्यावेत आणि नंतर लॉकडाऊन करावा”, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हे प्रकरण राजकीय विश्वात वादाचा विषय ठरू लागलं आहे.

“ …तर लॉकडाउनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे”; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा