22 February 2019

News Flash

अंधेरीत मधू इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये अग्नितांडव

मधू इंडस्ट्रीयल इस्टेट येथील इमारतीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार पाण्याचे टँकर्स घटनास्थळी पोहोचले

मधू इंडस्ट्रीयल इस्टेट येथील इमारतीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

अंधेरी पूर्वेतील मधू इंडस्ट्रीयल इस्टेट येथील इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मधू इंडस्ट्रीयल इस्टेट येथील इमारतीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार पाण्याचे टँकर्स घटनास्थळी पोहोचले. मात्र, आगीचे तीव्र स्वरुप पाहता आणखी नऊ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तीन तासांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

First Published on September 11, 2018 12:52 pm

Web Title: andheri fire broke out in building at madhu industrial estate fire engines at spot