20 September 2020

News Flash

Mumbai Fire : मृतांचा आकडा वाढला, उपचारादरम्यान अजून एकाचा मृत्यू

सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांदरम्यान अजून एकाचा मृत्यू

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला आहे. आगीतील मृतांचा आकडा 9 वर गेला असून शीला मोरवेकर या महिलेचा मृत्यू झाला आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

कामगार रूग्णालयाला सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं समजत आहे. आग लागल्यानंतर झालेला धूर कोंडला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आठ जणांचा मृत्यू झाला होता, आज अजून एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊ झाला आहे.

या आगीत 157 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचाही समावेश आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींना दोन लाख तर इतर जखमींना एक लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही मदत जाहीर केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 3:38 pm

Web Title: andheri hospital fire 9 died
Next Stories
1 ख्यातनाम जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
2 मुंबईकरांचा प्रवास होणार हाय-फाय; लोकलमध्ये WiFi
3 म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी
Just Now!
X