19 September 2020

News Flash

हेड मसाज देताना कंबर पकडली, अभिनेत्रीचा हेअर स्टायलिस्टवर आरोप

लेमन सलूनचा कर्मचारी सादीक अन्सारीने (२४) हेड मसाज देत असताना आपल्याला पकडले असा आरोपी तरुणीने केला.

अंधेरी लोखंडवाला येथील एक प्रसिद्ध सलूनचे दुकान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या सलूनमध्ये गेलेल्या एका २३ वर्षीय अभिनेत्रीने हेअरस्टायलिस्ट विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. लेमन सलूनचा कर्मचारी सादीक अन्सारीने (२४) हेड मसाज देत असताना आपल्याला पकडले असा आरोपी तरुणीने केला आहे. १६ मे रोजी ही घटना घडली. तरुणीने केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही असे सलूनचे म्हणणे आहे.

तरुणीने सादीकला मारहाण करण्यासाठी तिचा प्रियकर आणि त्याच्या भावाला बोलावले होते असे सलूनमधील सूत्रांनी सांगितले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे. लोखंडवाला मार्केटमध्ये असणाऱ्या लेमन सलूनमध्ये मी हेअर स्पा ट्रीटमेंट घेण्यासाठी १६ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गेली होती. हेअरस्टायलिस्ट सादीकने माझ्यावर काळया रंगाचा अॅप्रन ठेवला आणि माझ्या केसांवर स्पा ट्रीटमेंट सुरु केली.

मला तो हेड मसाजही देत होता. या दरम्यान त्याने माझी कंबर पकडली. जेव्हा मी किंचाळली तेव्हा त्याने सॉरी म्हटले. असे तरुणीने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. २० मे रोजी हा एफआयआर नोंदवला. मी महिला मॅनेजरकडे या घटनेबद्दल तक्रार केली. तेवढयात दोन अज्ञात लोक आत घुसले व त्यांनी सादीकला मारहाण सुरु केली. सलून बाहेर जमाव जमल्याने मी घाबरले. मी रिक्षा पकडली व तडक घरी पोहोचली. तक्रार करणारी अभिनेत्री मूळची दिल्लीची असून मागच्या चार वर्षांपासून ती आईसोबत मुंबईमध्ये रहाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 4:46 pm

Web Title: andheri lokhandwala lemon salon sadiq ansari hairstylist molestation head massage actress
Next Stories
1 मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे फ्लाय ओव्हरवर तेलाच्या टँकरने घेतला पेट
2 पश्चिम रेल्वे बदलणार लेडीज डब्यावरच्या ‘स्त्री’ची ओळख
3 मुंबईच्या गोवंडीमध्ये गोळीबाराचा थरार, दोन जखमी
Just Now!
X